WEBSITES

Tuesday, September 19, 2023

 जे वी सहारा  उत्सव मंडल

 1.सुख करता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची


सुख करता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची

नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची

सर्वांगी सुन्दर उटी शेंदु राची

कंठी झलके माल मुकताफळांची


जय देव जय देव, जय मंगल मूर्ति

दर्शनमात्रे मनःकमाना पूर्ति

जय देव जय देव


रत्नखचित फरा तुझ गौरीकुमरा

चंदनाची उटी कुमकुम केशरा

हीरे जडित मुकुट शोभतो बरा

रुन्झुनती नूपुरे चरनी घागरिया


जय देव जय देव, जय मंगल मूर्ति

दर्शनमात्रे मनःकमाना पूर्ति

जय देव जय देव


लम्बोदर पीताम्बर फनिवर वंदना

सरल सोंड वक्रतुंडा त्रिनयना

दास रामाचा वाट पाहे सदना

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना


जय देव जय देव, जय मंगल मूर्ति

दर्शनमात्रे मनःकमाना पूर्ति

जय देव जय देव

 जे वी सहारा  उत्सव मंडल

 2.श्री देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।

अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥

वारी वारीं जन्ममरणाते वारी ।

हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥


त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।

चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥

साही विवाद करितां पडिले प्रवाही ।

ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥


प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।

क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥

अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।

नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

  जे वी सहारा  उत्सव मंडल

3. शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।

वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।

तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥

जय देव जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा

आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।

अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥

विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ 

जय देव जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा


देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।

त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥

तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।

नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥

जय देव जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा


व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।

रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ 

जय देव जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा

 जे वी सहारा उत्सव मंडल


 4.विठोबाची आरती


युगे अठ्ठावीस विटेवरी उभा।

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा।

चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा।।1।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा।।

रखुमाईवल्लभा राहोच्या वल्लभा पावें जिवलगा ।जय देव जय देव


तुळसींमाळा गळां कर ठेवुनि कटीं।

कांसे पीतांबर कस्तुरि लल्लाटीं।

देव सुरवर नित्य येती भेटी।

गरुड हनुमंत पुढें उभे राहती ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा।।

रखुमाईवल्लभा राहोच्या वल्लभा पावें जिवलगा जय देव जय देव


धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा।

सुवर्णाचीं कमळें वनमाळा गळां।

राई रखुमाई राणीया सकळा।

ओंवाळिती राजा विठोबा सांवळा ।

जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा।।

रखुमाईवल्लभा राहोच्या वल्लभा पावें जिवलगा ।जय देव जय देव


ओंवाळूं आरत्या कुर्वड्या येती ।

चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती।

दिंड्या एताका वैष्णव नाचती।

पंढरीचा महिमा वर्णांवा किती ।

जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा।।

रखुमाईवल्लभा राहोच्या वल्लभा पावें जिवलगा ।जय देव जय देव


आषाढी कार्तिकी भक्तजन येती ओ साधुजन यति

चंद्रभागेमध्यें स्नानें जें करिती।

दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती।

केशवासी नामदेव भावे ओंवाळिती।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा।।

रखुमाईवल्लभा राहोच्या वल्लभा पावें जिवलगा ।जय देव जय देव

  जे वी सहारा उत्सव मंडल

5.विठ्ठल आरती

येई हो विठ्ठले माझे माऊलीये

येई हो विठ्ठले माझे माऊलीये


विढळावरी कर...

विढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे

ओ, देवा वाट मी पाहे


येई हो विठ्ठले माझे माऊलीये

येई हो विठ्ठले माझे माऊलीये

आलीया, गेलीया हाती धाडी निरोपं

आलीया, गेलीया हाती धाडी निरोपं


पंढरपूरी आहे...

पंढरपूरी आहे माझा माय-बाप

ओ, माझा माय-बाप


येई हो विठ्ठले माझे माऊलीये

येई हो विठ्ठले माझे माऊलीये

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला?

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला?


गरुडावरी बैसुनी...

गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला

ओ, माझा कैवारी आला


येई हो विठ्ठले माझे माऊलीये

येई हो विठ्ठले माझे माऊलीये

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी


विष्णू दास नामा...

विष्णू दास नामा जीवे-भावे ओवाळी

ओ, जीवे-भावे ओवाळी


येई हो विठ्ठले माझे माऊलीये

येई हो विठ्ठले माझे माऊलीये

येई हो विठ्ठले माझे माऊलीये

 जे वी सहारा उत्सव मंडल

 6 आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा


आरती ज्ञानराजा 

महाकैवाल्य तेजा, कैवल्य तेजा

सेवती साधू संत मन वेधला माझा

वेधला माझा आरती ज्ञानराजा


लोपले ज्ञान जगी 

हित नेणती कोणी ,नेणती कोणी

अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी

ठेवीले ज्ञानी आरती ज्ञानराजा


कनकाचे ताट करी 

उभ्या गोपिका नारी, गोपिका नारी

नारद तुंबरो हो सम ज्ञान करी ज्ञान करी

आरती ज्ञानराजा


प्रगट गृह बोले 

विश्व ब्र्म्हाची केले,ब्रम्हाची केले

राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले

मस्तक ठेविले आरती

आरती ज्ञानराजा 

महाकैवाल्य तेजा, कैवल्य तेजा

सेवती साधू संत मन वेधला माझा

वेढला माझा आरती ज्ञानराजा

   जे वी सहारा उत्सव मंडल

 7 ॐ जय जगदीश हरे,


ॐ जय जगदीश हरे,

स्वामी जय जगदीश हरे ।

भक्त जनों के संकट,

दास जनों के संकट,

क्षण में दूर करे ॥

॥ ॐ जय जगदीश हरे..॥


जो ध्यावे फल पावे,

दुःख बिनसे मन का,

स्वामी दुःख बिनसे मन का ।

सुख सम्पति घर आवे,

सुख सम्पति घर आवे,

कष्ट मिटे तन का ॥

॥ ॐ जय जगदीश हरे..॥


मात पिता तुम मेरे,

शरण गहूं किसकी,

स्वामी शरण गहूं मैं किसकी ।

तुम बिन और न दूजा,

तुम बिन और न दूजा,

आस करूं मैं जिसकी ॥

॥ ॐ जय जगदीश हरे..॥


तुम पूरण परमात्मा,

तुम अन्तर्यामी,

स्वामी तुम अन्तर्यामी ।

पारब्रह्म परमेश्वर,

पारब्रह्म परमेश्वर,

तुम सब के स्वामी ॥

॥ ॐ जय जगदीश हरे..॥


तुम करुणा के सागर,

तुम पालनकर्ता,

स्वामी तुम पालनकर्ता ।

मैं मूरख फलकामी,

मैं सेवक तुम स्वामी,

कृपा करो भर्ता॥

॥ ॐ जय जगदीश हरे..॥


तुम हो एक अगोचर,

सबके प्राणपति,

स्वामी सबके प्राणपति ।

किस विधि मिलूं दयामय,

किस विधि मिलूं दयामय,

तुमको मैं कुमति ॥

॥ ॐ जय जगदीश हरे..॥


दीन-बन्धु दुःख-हर्ता,

ठाकुर तुम मेरे,

स्वामी रक्षक तुम मेरे ।

अपने हाथ उठाओ,

अपने शरण लगाओ,

द्वार पड़ा तेरे ॥

॥ ॐ जय जगदीश हरे..॥


विषय-विकार मिटाओ,

पाप हरो देवा,

स्वमी पाप(कष्ट) हरो देवा ।

श्रद्धा भक्ति बढ़ाओ,

श्रद्धा भक्ति बढ़ाओ,

सन्तन की सेवा ॥


ॐ जय जगदीश हरे,

स्वामी जय जगदीश हरे ।

भक्त जनों के संकट,

दास जनों के संकट,

क्षण में दूर करे ॥

  जे वी सहारा उत्सव मंडल

 8 आरती घालीन लोटांगण

घालीन लोटांगण, वंदीनचरण।

डोळ्यांनीपाहीनरुपतुझें।

प्रेमेंआलिंगन, आनंदेपूजिन।

भावेंओवाळीन म्हणेनामा।।१।।

त्वमेवमाताचपितात्वमेव।

त्वमेवबंधुक्ष्च सखात्वमेव।

त्वमेवविध्याद्रविणं त्वमेव।

त्वमेवसर्वंममदेवदेव।।२।।

कायेनवाचामनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मनावाप्रकृतिस्वभावात।

करोमियध्य्तसकलंपरस्मे, नारायणायेति समर्पयामि।।३।।

अच्युतंकेशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।

श्रीधरं माधवंगोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्रभजे।।४।।

हरेरामहरराम, रामरामहरेहरे।

हरेकृष्णहरेकृष्ण, कृष्णकृष्णहरेहरे।

जे वी सहारा उत्सव मंडल


9 सदा सर्वदा योग तूझा घडावा |

सदा सर्वदा योग तूझा घडावा |

तुझे कारणी देह माझा पडावा |

उपेक्षू नको गूणवंता अनंता |

रघूनायका मागणे हेचि आतां ||


कैलास राणा शिव चंद्रमौळी |

फणींद्र माथा मुकुटी झळाळी ||

कारुण्य सिंधू भवदु:खहारी |

तुजवीण शंभो मज कोण तारी ||


मोरया मोरया मी बाळ तान्हें |

तुझीच सेवा करु काय जाणे ||

अन्याय माझे कोट्यानुकोटी |

मोरेश्वरा ब तू घाल पोटी ||


ज्या ज्या ठीकांणी मन जाय माझे |

त्या त्या ठीकांणी निजरुप तुझे ||

मी ठेवितो मस्तक ज्या ठीकांणी |

तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ||


अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र |

तिथे नांदतो ग्यानराजा सुपात्र |

तया आठविता महापुण्यराशी|

नमस्कार माझा सदगुरु गयानेश्वराशी ||

                                  जे वी सहारा उत्सव मंडल

 10  = बाप्पा मोरया

                             जे वी सहारा  उत्सव मंडल

 11 ||श्री गणपती स्तोत्र|


साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका ।

भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती ॥ १ ॥


प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते ।

तिसरे श्री कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ॥ २ ॥


पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव ते ।

सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ॥ ३ ॥


नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक ।

अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन ॥ ४ ॥


देवनांवे अशी बारा तीन संध्या म्हणे नर ।

विघ्नभीती नसे त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धिदे ॥ ५ ॥


विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन ।

पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ॥ ६ ॥


जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ ।

एक वर्ष पुर्ण होतां मिळे सिद्धी न संशय ॥ ७ ॥


नारदांनी रचिलेले झाले संपू्र्ण स्तोत्र हें ।

श्रीधराने मराठींत पठण्या अनुवादिले ॥ ८ ॥

                         जे वी सहारा  उत्सव मंडल

12. कर्पूर गौरम करूणावतारम / श्लोक|


 कर्पूरगौरं करुणावतारं,

संसारसारं भुजगेन्द्र हारम्।

सदा बसन्तं हृदयारबिन्दे,

भवं भवानी सहितं नमामि ।।



मंगलम भगवान् विष्णु,

मंगलम गरुड़ ध्वजः।

मंगलम पुन्डरीकाक्ष,

मंगलाय तनो हरि ।।


सर्व मंगल मांग्लयै,

शिवे सर्वार्थ साधिके।

शरण्ये त्रयम्बके गौरी,

नारायणी नमोस्तुते ।।


त्वमेव माता च पिता त्वमेव,

त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव।

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव,

त्वमेव सर्वं मम देव देव ।।


कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा,

बुध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात।

करोमि यध्य्त सकलं परस्मै,

नारायणायेति समर्पयामि ।।


श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी,

हे नाथ नारायण वासुदेवा।

जिह्वे पिबस्वा मृतमे तदेव,

गोविंद दामोदर माधवेती ।।