WEB PAGE

Sunday, September 28, 2025

शंकराची आरती

 


 शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा

तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां

जय देव जय देव जय शिवशंकरा  स्वामी शंकरा

आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ध्रु०

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा

अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा

विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा  

जय देव जय देव जय शिवशंकरा  स्वामी शंकरा

 

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें

त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें

तें त्वां असुरपणें प्राशन केलें

नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें

जय देव जय देव जय शिवशंकरा  स्वामी शंकरा

 

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी

रघुकुळटिळक रामदासा अंतरीं  

जय देव जय देव जय शिवशंकरा  स्वामी शंकरा

No comments:

Post a Comment