Tuesday, September 19, 2023

 जे वी सहारा उत्सव मंडल

 6 आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा


आरती ज्ञानराजा 

महाकैवाल्य तेजा, कैवल्य तेजा

सेवती साधू संत मन वेधला माझा

वेधला माझा आरती ज्ञानराजा


लोपले ज्ञान जगी 

हित नेणती कोणी ,नेणती कोणी

अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी

ठेवीले ज्ञानी आरती ज्ञानराजा


कनकाचे ताट करी 

उभ्या गोपिका नारी, गोपिका नारी

नारद तुंबरो हो सम ज्ञान करी ज्ञान करी

आरती ज्ञानराजा


प्रगट गृह बोले 

विश्व ब्र्म्हाची केले,ब्रम्हाची केले

राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले

मस्तक ठेविले आरती

आरती ज्ञानराजा 

महाकैवाल्य तेजा, कैवल्य तेजा

सेवती साधू संत मन वेधला माझा

वेढला माझा आरती ज्ञानराजा

No comments:

Post a Comment