Showing posts with label श्री काल भैरव देव. Show all posts
Showing posts with label श्री काल भैरव देव. Show all posts

Monday, March 15, 2021

श्री कालभैरव वरद स्तोत्र |


ॐ नमो श्री गजवदना । गणराया गौरीवंदना ।।

विघ्नेशा भवभय हरणा । नमन माझे साष्टांगी ।।1।।


नंतर नमिली श्री सरस्वती । जगन्माता भगवती ।।

ब्रम्हकुमारी विणावती । वियादात्री विश्वाची ।।2।।


नमन तसे गुरुवर्या । सुखनिधान सद्गुरुराया ।।

स्मरुनी त्या पवित्र पाया । चित्तशुद्धि जाहली ।।3।।


थोर ऋषिमुनी संतजन । बुधगण आणि सज्जन ।।

करुनी तयांसी नमन । ग्रंथरचना आरंभली ।।4।।


पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी । भेटले कार्तिकेयस्वामींसी ।।

नमस्कार करुनी तयांसी । प्रश्न विचारु लागले ।।5।।


तेहतीस कोटी देव असती । प्रत्येक आपणच श्रेष्ठ म्हणती ।।

सामान्य माणसाची मती । गुंग होऊनी जातसे ।।6।।


गाणपत्य म्हणती गणपती । शाक्त म्हणती महाशक्ति ।।

स्मार्त म्हणती पशुपती । वैष्णव म्हणती श्रीविष्णु ।।7।।


नाना देव नाना देवता । प्रत्येकाची ज्येष्ठश्रेष्ठता ।।

आपापल्या परीने भक्ता । आकर्षुनी घेतसे ।।8।।


हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ । कोण कोणाहुनी कनिष्ठ ।।

हे न कळल्याने स्पष्ट । मन संभ्रमी पडतसे ।।9।।


कोणी म्हणती कालभैरव । हाच खरा महादेव ।।

तयाचे कृपेने सदैव । सकल कल्याण होतसे ।।10।।


कालभैरव हा देव कुठला । कसा त्याचा उद्भव झाला ।।

हें जाणण्याची मला । आतुरता फार लागली ।।11।।


तरी आता कृपा करुनी । कोणता देव श्रेष्ठ सर्वांहुनी ।।

ते मज सांगावे समजावुनी । उपकार मोठे होतील ।।12।।


तेव्हां स्कंदानीं अगस्तीसी । जी कथा सांगितली अपूर्वसी ।।

ती सांगतों सर्वासीं । म्हणे मिलिंदमाधव ।।13।।


सुमेरू पर्वतावरी एकेकाळीं । ब्रह्मादि सकळ देवमंडळी ।

चर्चा करीत होती बसली । तेव्हां काय जाहलें ।।14।।


ऋषी आणि मुनीजन । सर्वानी एकत्र जमून ।

सुमेरूवरी केलें आगमन । घेतलें दर्शन देवांचें ।।15।।


ब्रह्मदेवासी हात जोडून । त्यानी केला एक प्रश्न ।

” देवांमाजी सर्वश्रेष्ठ कोण । प्रभो आम्हां सांगावे “।।16।।


तेव्हां त्या ब्रह्मदेवाने । स्वसामर्थ्याच्या अहंकाराने ।

आणिक अतिशय अविचाराने । उत्तर दिलें झडकरी ।।17।।


मी संपूर्ण सृष्टीचा निर्माता । स्वयंभू अनादि ब्रह्म असतां ।

माझी असामान्य श्रेष्ठता । स्वयंसिध्दच आहे कीं ।।18।।


ब्रह्मदेवाची गर्वोक्ति ऐकून । क्रोधायमान झाले ऋतुनारायण ।

म्हणाले,” हें आहे तुझें अज्ञान । सत्य तूं न जाणसी ।।19।।


मी विश्वाचा पालनकर्ता । मीच सृष्टीचा नियंता ।

मीच गतिशक्तीचा कर्ता । प्रत्यक्ष यज्ञस्वरूप मी ।।20।।


मी आहे परमज्योती । मीच आहे परागती ।

केलिस सृष्टिची उत्पत्ति । माझ्याच प्रेरणेने तूं ।।21।।


अर्थात तूं श्रेष्ठ नसून । मीच आहे श्रेष्ठ जाण ।

स्वतःकडे घेसी मोठेपण । काय तुला म्हणावें “।।22।।


झालें, ऐसें जुंपलें भांडण । ” मीच श्रेष्ठें ” म्हणती दोघेजण ।

शेवटीं ” वेदांसी विचारूं आपण “। असें त्यांनीं ठरविलें ।।23।।


ऋग्वेद आणि यजुर्वेद । सामवेद आणि अथर्ववेद ।

यांच्याशीं केला वादविवाद । ” श्रेष्ठ देव कोण असे ? “।।24।।


ऋग्वेद म्हणे ” ज्याचे पासून । सर्वांचें होते प्रवर्तन ।

ज्यांत भूतमात्रांचा विलय जाण । तोच रुद्र श्रेष्ठ असे “।।25।।


यजुर्वेद म्हणे विचार करून । योगद्वारें होतें ज्याचें अर्चन ।

यज्ञयागांचा स्वामी स्वयंप्रमाण । शिव तो श्रेष्ठ जाणावा ।।26।।


साम म्हणे ” ज्यामध्यें विश्वाचें भ्रमण । योगीजन करिती जयाचें ध्यान ।

ज्याच्या तेजें ब्रह्मांड उजळे पूर्ण । एक त्र्यंबक श्रेष्ठ तो ” ।।27।।


अथर्व देई तसेच उत्तर। म्हणे ” जो भक्तांचे दु:ख करी दूर।।

तोच कैवल्यरूप श्रीशंकर। श्रेष्ठ असे सवांर्हुनी ” ।।28।।


वेदांचे उत्तर ऐकून । ब्रह्मा आणि नारायण ।।

दोघांनीही संतापून । निंदा केली शिवाची ।।29।।


तोंच अमूर्त प्रणव सनातन । मूर्त स्वरूप करूनी धारण ।।

म्हणे स्वयंज्योती शंकर भगवान । सर्व देवांत श्रेष्ठ असें ।।30।।


तरीही दोघांचे भांडण । संपले नाही मुळीच जाण ।।

दूर होईना त्यांचे अज्ञान । तेव्हा चमत्कार जाहला ।।31।।


दोघांच्या मध्ये एक विराट । दिव्य प्रकाशज्योत झाली प्रगट।।

त्या ज्योतीचा लखलखाट । विश्वव्यापी भासला ।।32।।


हां हां म्हणता ज्योतिर्मंडली । एक बालकाकृती दिसु लागली ।।


दिव्य तेजप्रभा आगळी । मुखावरी विलसतसे ।।33।।


वर्ण शुद्धनिलांजनासमान । त्रिनेत्र विचित्र नागभूषण ।।

त्रिशूळ वाजवी खणखण । शिवाचा अंशावतार तो ।।34।।


ज्याला बघुनी प्रत्यक्ष काळ । भयभीत होई कांपे चळचळ ।।

कालभैरव नावे सकळ । संबोधती तयाला ।।35।।


दुष्टांचे करी तो दमन । यास्तव ’ आमर्दक ’ नामाभिधान ।।

भक्तांचे पाप करी भक्षण ।। म्हणूनी पापभक्षक तो ।।36।।


’ कालराज ’ हेही नाव त्याचे । रक्षण करी तो काशी क्षेत्राचें ।।

पारिपत्य करुनी पाप्यांचें । शासन घोर करीतसे ।।37।।


अंगी विश्वोद्धारक शक्ति । त्रिलोकी जयाची थोर कीर्ती ।।

ऐसी पाहूनी बालमूर्ति । ब्रह्मदेव त्यासी बोलला ।।38।।


माझ्या पांचव्या मुखापासुनी । जन्म तुझा झाला म्हणोनी ।।

मला आता शरण येउनी । शुभाशिर्वाद घेई तू ।।39।।


भणाणले ब्रम्हदेवाचे मस्तक । शिवनिंदा करी पाचवे मुख ।।

ऐकुनी त्याची बकबक ।। काळभैरव क्रुद्ध जाहला।।40।।


भव्य रूप प्रगट केले । अक्राळ विक्राळ आगळे ।।

डोळे लालेलाल झाले । जळत्या निखार्‍यासारखे।।41।।


मग त्या काळभैरवानें । डाव्या करंगळीच्या नखाने ।।

ब्रह्मदेवाचे शिर छाटिले रागाने । अपराध केला म्हणोनी ।।42।।


तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे । एका क्षणात चक्क उघडले ।।

आणि त्यांनी हात जोडीले । चुकलो चुकलो म्हणोनी ।।43।।


नारायणेंही तेंच केले । भैरवस्तुती स्तोत्र गाईले ।।

दोघांनाही सत्य ज्ञान झालें । प्रत्यक्ष शिव प्रगटले ।।44।।


देवांनी केली पुष्पवृष्टी । आनंदे भरली सर्व सृष्टि ।।

श्रीशंकराची दयादृष्टि । अभय देई दोघांना ।।45।।


शिव म्हणे ब्रह्मदेवाला । आणि यज्ञस्वरूपी नारायणाला ।।

मीच हा अवतार घेतला । अज्ञान दूर करायासी ।।46।।


अष्टभैरव माझे अंशावतार । काळभैरव हा सर्वाहुनी थोर ।।

त्याची तीन स्वरूपे अगोचर । जाणते तेच जाणती ।।47।।


महाकाळ,बटुकभैरव । तिसरा स्वर्णाकर्षणभैरव ।

तयावरी ठेविती भक्तीभाव । त्यांचे कल्याण होतसे ।।48।।


क्षेत्रपाल,ईशानचंडेश्वर । मृत्युंजय,मंजुघोष,अर्धनारीश्वर।

नीलकंठ,दंडपाणी,दक्षिणामूर्तिवीर । अवतार माझेच असती ते।।49।।


काळभैरवाची करतील भक्ती । त्यांची होईल कामनापूर्ती ।।

विघ्नेदु:खें दूर होती । सत्य सत्य वाचा ही ।।50।।


मग म्हणे काळभैरवासी । तूं जरी माझा अवतार अससी ।।

तरीही स्पष्ट सांगतो तुजसी । सत्य ते सत्य मानावे ।।51।।


ब्रह्मदेवाचे पाचवे मुख । माझी निंदा करी नाहक ।।

म्हणुनी फक्त तेंच मस्तक । कापिंलेस तूं कोपाने ।।52।।


क्रोधाग्नि पेटता मनी । विवेकबुद्धि भस्म होउनी ।।

घडती पापें हातुनी । अविचारी अनर्थ होतसे ।। 53।।


तू वागलास अविचाराने । तुझ्या त्या दुष्कृत्याने ।

ब्रह्महत्येच्या महापातकाने । ग्रासिले असे तुजलागी ।।54।।


ब्रम्हहत्येचे पाप अघोर । दुष्परिणाम त्याचे थोर ।।

कोणी कितीही असो बलवत्तर । पापमुक्त न होई ।।55।।


जो कोणी महापातक करी । तो तो जातो नरकपुरी ।।

अनंत युगे दु:ख भारी । भोगणे प्राप्त होतसे ।। 56।।


जेव्हा महापातकी प्राणी । मुक्त होतो नरककुंडातुनी ।।

त्याला वृक्षवेली शिळा योनी । सप्त लक्ष वर्षे लाभते ।।57।।


त्यानंतर कीड, मुंगी जीव योनी । सात हजार वर्षे कष्ट भोगुनी ।

पशुपक्षादि अनेक जन्म घेऊनी । दु:ख भोगी अपार ।।58।।


हे शिवाचे भाषण ऐकुनी । काळभैरव घाबरला मनीं ।।

म्हणे मुक्त व्हावया पापातुनी । काही उपाय सांगावा ।। 59।।


शिव म्हणे मग त्यासी । एक उपाय सांगतो तुजसी ।।

पृथ्वीवरील ती वाराणसी । अविमुक्त तें क्षेत्र असे ।।60।।


त्या क्षेत्राचे रक्षण । चण्डिका करिती रात्रंदिन ।।

त्या सर्वांचे नामाभिधान । ऐक आता सांगतो ।।61।।


दुर्गा उभी दक्षिणेला । अंतरेश्वरी नैऋत्येला ।।

अंगारेश्वरी पश्चिमेला । सुसज्ज असे सर्वदा ।। 62।।


भद्रकाली असे वायव्येला । भीमचंडी उभी उत्तरेला ।।

महामत्ता ईशान्यदिशेला । क्षेत्ररक्षण करितसे ।।63।।


उर्ध्वकेशी सहित शंकरी ।। पूर्व दिशेचे रक्षण करी ।।

अध:केशी आग्नेय कोनावरी ।। लक्ष ठेवी अखंडित ।।64।।


ऐसे ते काशीक्षेत्र जाण । भूलोकी असे पवित्र पावन ।।

तेथील पंचगंगेत करिता स्नान । पापक्षालन होतसे ।।65।।


देवदेवता, यक्ष किन्नर । नाग, सिद्ध आणि विद्याधर ।।

पिशाच्चें आणि नारीनर । होती पापमुक्त तिथें ।।66।।


त्या क्षेत्री तु जाशील जेव्हा । पापमुक्त तुही होशील तेव्हा ।।

वंद्य होऊनी सर्व देवा । सुखें तेथे राहशील ।।67।।


घ्यावयासि आतां प्रायश्चित्त । कापलेले मस्तक घे हातांत ।।

काशीला जा भिक्षा मागत । पापमुक्त व्हाया ।।68।।


ऐसे बोलुनी क्षणात । कैलासपती झाले गुप्त ।।

काळभैरव तिन्ही लोकात । भ्रमण करु लागला ।।69।।


तो पुढे पुढे चाले जरी । महापातक त्याचा पाठलाग करी ।।

येता वाराणशीच्या वेशीवरी । पाप तेथेच थांबले ।। 70।।


काळभैरव प्रवेशिता काशीक्षेत्री । हातांतील शीर पडले खालती ।।

त्या स्थळा ” कपालमोचन ” म्हणती । तीर्थ प्रसिद्ध झाले तें ।।71।।


काळभैरव झाला तेथील । शहराचा मुख्य कोतवाल ।।

दैवत थोर काशीतील । सर्वाहुनी ठरला श्रेष्ठ तो ।।72।।


आधीं दर्शन काळभैरवाचे । नंतर श्रीकाशीविश्वेश्वराचे ।।

ऐशापरी वागती तयांचे । सकल पाप जातसे ।।73।।


कार्तिक मास तो पवित्र । वद्य अष्टमी पवित्र फार ।।

काळभैरवाचा अवतार । शुभदिनी त्या जाहला ।।74।।


कोणतीही अष्टमी , चतुर्दशी । रविवार किंवा मंगळवार दिवशी ।।

शरण जावे काळभैरवासी । करावी पूजाप्रार्थना ।।75।।


तोतो होतो प्रसन्न ज्याला । दु:ख चिंता नसते त्याला ।।

अशुभ अमंगल जाते लयाला । सकल सिद्धी लाभती ।।76।।


होते इच्छित दीर्घायु संतती । मिळते स्थावरजंगम संपत्ती ।।

काळभैरवाचे महात्म्य किती । आणि कैसे वर्णावे ।।77।।


शत्रुभय आणि चोरभय । समूळ निश्चये नष्ट होय ।।

म्हणुनी तयाचेच पाय । धरावे भक्तिभावाने ।।78।।


वैभवशिखरीं भक्त चढे । दिनोदिनी लौकिक वाढे ।।

त्यासी पाहता काळ दडे । काळभैरवाच्या धाकाने ।।79।।


राजलक्ष्मी आणि राजमान्यता । मिळे समाजांत मानमान्यता ।।

काळभैरवाच्या सत्य भक्ता । उणे न पडे काहींही ।।80।।


स्कंदस्वामींचे भाषण ऐकुनी । समाधान पावले अगस्तीमुनी ।।

काळभैरवस्मरण करीत मनी । स्वस्थानी गेले आनंदे ।।81।।


यास्तव जोडुनी दोन्ही हस्त । म्हणावे काळभैरव वरद स्तोत्र ।।

जपावा काळभैरव मंत्र । निशिदिनी मनीं अखंड 82।।


ऐसे करील जो सहामास । काळभैरव प्रसन्न होईल त्यास ।।

देव भक्तांचा होतो दास । स्वंयसिद्ध सत्य हे ।।83।।


कोणी रंक असो वा राव । हृदयी धरुनी दृढभाव ।।

प्रार्थना करिता काळभैरव । धाउनी येई संकटी ।।84।।


सदा ठेवुनी सद्वर्तन । करिती जे काळभैरव स्मरण ।।

तयांसी साक्षात शंकर भगवान । प्रत्यक्ष दर्शन देतसे ।। 85।।


भैरवाचे कराया पूजन चिंतन । काळवेळेचे नसे बंधन ।।

स्त्रीपुरुषांनी त्यासी निशिदिन । भक्तिभावे भजावे ।।86।।


घरींदारी, कचेरीत, । वाटेत किंवा प्रवासात ।

नामस्मरण करावे अखंडित । तेणे कल्याण होतसे ।।87।।


काळभैरव होता प्रसन्न । पळते पाप आणि दैन्य ।।

मिळते विपुलधनधान्य । ऐसे सामर्थ्य तयांचे ।।88।।


अघोरीविद्या, मंत्रतंत्रशक्ती । भैरवभक्तांसी कधी न बाधती ।।

स्तोत्र हे जेथे पठण करिती । तेथें भुतेखेते न राहती ।।89।।


काळभैरवासी नित्य स्मरता । बंदिवासातुन होते मुक्तता ।।

येते हाती राजसत्ता । ऐसा समर्थ देव तो ।।90।।


ॐ असितांगभैरवाय नम:। ॐ रुरुभैरवाय नम:।।

ॐ चंडभैरवाय नम:। ॐ क्रोधभैरवाय नम:।।91।।


ॐ उन्मत्तभैरवाय नम:।ॐ कपालीभैरवाय नम:।।

ॐ भीषणभैरवाय नम:। ॐ संहारभैरवाय नमो नम:।।92।।


ॐ महाकाळा, महाकोशा। महाकाया, विश्वप्रकाशा ।।

मत्ता, महेशा, सर्वेशा । काळभैरवाय नमो नम: ।।93।।


संहाररूपा, खट्वांगधारका । कंकाळा, पापपुण्यशोधका ।।

सुराराध्या, तापहारका । काळभैरवाय नमो नम: ।।94।।


लोलाक्षा, लोकवर्धना । लोस्याप्रिया, श्वानवाहना ।।

भुतनाथा, भुतभावना । काळभैरवाय नमो नम: ।।95।।


हे श्री देवाधिदेवा । कराल वदना, काळभैरवा ।।

कृपाशिर्वाद नित्य असावा । पदीं लीन जाहला ।।96।।


कुटुंबातील सर्व व्यक्ती । त्यांसी दीर्घायुष्य, आरोग्य, शक्ति ।।

बुध्दि, किर्ती, संपत्ती । देऊनी वंश वाढवी ।।97।।


जाऊं आम्ही जेथें जेथें । कार्यसिध्दी होवो तेथें ।।

मनी कुविचार भलभलते । येऊं नको देऊं तूं ।।98।।


मिलिंदमाधव याच साठी । तुझ्या पायी घाली मिठी ।।

अपराध पापें कोटीकोटी । क्षमा त्यांची करावी ।।99।।


घरीं नांदो सतत शांतता । पडूं नये कशाची कमतरता ।।

योगक्षेमाची नसावी चिंता । हेंच देंवा मागणे ।। 100।।


शके अठराशे सत्याण्णवासी । माघमासी कृष्णपक्षीं ।।

चतुर्दशी महाशिवरात्रीसी । ग्रंथ पूर्ण झाला हा ।।101।।


श्री काळभैरवार्पणमस्तु ।। शुभं भवतु ।। काळभैरव वरद स्तोत्र ग्रंथ संपूर्ण ।।

Saturday, February 20, 2021

श्री स्वर्णाकर्षण भैरव स्तोत्र -


। श्री मार्कण्डेय उवाच ।।



भगवन् ! प्रमथाधीश ! शिव-तुल्य-पराक्रम !

पूर्वमुक्तस्त्वया मन्त्रं, भैरवस्य महात्मनः ।।

इदानीं श्रोतुमिच्छामि, तस्य स्तोत्रमनुत्तमं ।

तत् केनोक्तं पुरा स्तोत्रं, पठनात्तस्य किं फलम् ।।

तत् सर्वं श्रोतुमिच्छामि, ब्रूहि मे नन्दिकेश्वर ! ।।




।। श्री नन्दिकेश्वर उवाच ।।

इदं ब्रह्मन् ! महा-भाग, लोकानामुपकारक ! स्तोत्रं वटुक-नाथस्य, दुर्लभं भुवन-त्रये ।।

सर्व-पाप-प्रशमनं, सर्व-सम्पत्ति-दायकम् । दारिद्र्य-शमनं पुंसामापदा-भय-हारकम् ।।

अष्टैश्वर्य-प्रदं नृणां, पराजय-विनाशनम् । महा-कान्ति-प्रदं चैव, सोम-सौन्दर्य-दायकम् ।।

महा-कीर्ति-प्रदं स्तोत्रं, भैरवस्य महात्मनः । न वक्तव्यं निराचारे, हि पुत्राय च सर्वथा ।।

शुचये गुरु-भक्ताय, शुचयेऽपि तपस्विने । महा-भैरव-भक्ताय, सेविते निर्धनाय च ।।

निज-भक्ताय वक्तव्यमन्यथा शापमाप्नुयात् । स्तोत्रमेतत् भैरवस्य, ब्रह्म-विष्णु-शिवात्मनः ।।

श्रृणुष्व ब्रूहितो ब्रह्मन् ! सर्व-काम-प्रदायकम् ।।



विनियोग

ॐ अस्य श्रीस्वर्णाकर्षण-भैरव-स्तोत्रस्य ब्रह्मा ऋषिः, अनुष्टुप् छन्दः, श्रीस्वर्णाकर्षण-भैरव-देवता, ह्रीं बीजं, क्लीं शक्ति, सः कीलकम्, मम-सर्व-काम-सिद्धयर्थे पाठे विनियोगः ।


ध्यान

मन्दार-द्रुम-मूल-भाजि विजिते रत्नासने संस्थिते ।

दिव्यं चारुण-चञ्चुकाधर-रुचा देव्या कृतालिंगनः ।।


भक्तेभ्यः कर-रत्न-पात्र-भरितं स्वर्ण दधानो भृशम् ।

स्वर्णाकर्षण-भैरवो भवतु मे स्वर्गापवर्ग-प्रदः ।।


।। स्तोत्र-पाठ ।।


ॐ नमस्तेऽस्तु भैरवाय, ब्रह्म-विष्णु-शिवात्मने, नमः त्रैलोक्य-वन्द्याय, वरदाय परात्मने ।।

रत्न-सिंहासनस्थाय, दिव्याभरण-शोभिने । नमस्तेऽनेक-हस्ताय, ह्यनेक-शिरसे नमः । नमस्तेऽनेक-नेत्राय, ह्यनेक-विभवे नमः ।।


नमस्तेऽनेक-कण्ठाय, ह्यनेकान्ताय ते नमः । नमोस्त्वनेकैश्वर्याय, ह्यनेक-दिव्य-तेजसे ।।

अनेकायुध-युक्ताय, ह्यनेक-सुर-सेविने । अनेक-गुण-युक्ताय, महा-देवाय ते नमः ।।

नमो दारिद्रय-कालाय, महा-सम्पत्-प्रदायिने । श्रीभैरवी-प्रयुक्ताय, त्रिलोकेशाय ते नमः ।।

दिगम्बर ! नमस्तुभ्यं, दिगीशाय नमो नमः । नमोऽस्तु दैत्य-कालाय, पाप-कालाय ते नमः ।।

सर्वज्ञाय नमस्तुभ्यं, नमस्ते दिव्य-चक्षुषे । अजिताय नमस्तुभ्यं, जितामित्राय ते नमः ।।

नमस्ते रुद्र-पुत्राय, गण-नाथाय ते नमः । नमस्ते वीर-वीराय, महा-वीराय ते नमः ।।

नमोऽस्त्वनन्त-वीर्याय, महा-घोराय ते नमः । नमस्ते घोर-घोराय, विश्व-घोराय ते नमः ।।

नमः उग्राय शान्ताय, भक्तेभ्यः शान्ति-दायिने । गुरवे सर्व-लोकानां, नमः प्रणव-रुपिणे ।।

नमस्ते वाग्-भवाख्याय, दीर्घ-कामाय ते नमः । नमस्ते काम-राजाय, योषित्कामाय ते नमः ।।

दीर्घ-माया-स्वरुपाय, महा-माया-पते नमः । सृष्टि-माया-स्वरुपाय, विसर्गाय सम्यायिने ।।

रुद्र-लोकेश-पूज्याय, ह्यापदुद्धारणाय च । नमोऽजामल-बद्धाय, सुवर्णाकर्षणाय ते ।।

नमो नमो भैरवाय, महा-दारिद्रय-नाशिने । उन्मूलन-कर्मठाय, ह्यलक्ष्म्या सर्वदा नमः ।।

नमो लोक-त्रेशाय, स्वानन्द-निहिताय ते । नमः श्रीबीज-रुपाय, सर्व-काम-प्रदायिने ।।

नमो महा-भैरवाय, श्रीरुपाय नमो नमः । धनाध्यक्ष ! नमस्तुभ्यं, शरण्याय नमो नमः ।।

नमः प्रसन्न-रुपाय, ह्यादि-देवाय ते नमः । नमस्ते मन्त्र-रुपाय, नमस्ते रत्न-रुपिणे ।।

नमस्ते स्वर्ण-रुपाय, सुवर्णाय नमो नमः । नमः सुवर्ण-वर्णाय, महा-पुण्याय ते नमः ।।

नमः शुद्धाय बुद्धाय, नमः संसार-तारिणे । नमो देवाय गुह्याय, प्रबलाय नमो नमः ।।

नमस्ते बल-रुपाय, परेषां बल-नाशिने । नमस्ते स्वर्ग-संस्थाय, नमो भूर्लोक-वासिने ।।

नमः पाताल-वासाय, निराधाराय ते नमः । नमो नमः स्वतन्त्राय, ह्यनन्ताय नमो नमः ।।

द्वि-भुजाय नमस्तुभ्यं, भुज-त्रय-सुशोभिने । नमोऽणिमादि-सिद्धाय, स्वर्ण-हस्ताय ते नमः ।।

पूर्ण-चन्द्र-प्रतीकाश-वदनाम्भोज-शोभिने । नमस्ते स्वर्ण-रुपाय, स्वर्णालंकार-शोभिने ।।

नमः स्वर्णाकर्षणाय, स्वर्णाभाय च ते नमः । नमस्ते स्वर्ण-कण्ठाय, स्वर्णालंकार-धारिणे ।।

स्वर्ण-सिंहासनस्थाय, स्वर्ण-पादाय ते नमः । नमः स्वर्णाभ-पाराय, स्वर्ण-काञ्ची-सुशोभिने ।।

नमस्ते स्वर्ण-जंघाय, भक्त-काम-दुघात्मने । नमस्ते स्वर्ण-भक्तानां, कल्प-वृक्ष-स्वरुपिणे ।।

चिन्तामणि-स्वरुपाय, नमो ब्रह्मादि-सेविने । कल्पद्रुमाधः-संस्थाय, बहु-स्वर्ण-प्रदायिने ।।

भय-कालाय भक्तेभ्यः, सर्वाभीष्ट-प्रदायिने । नमो हेमादि-कर्षाय, भैरवाय नमो नमः ।।

स्तवेनानेन सन्तुष्टो, भव लोकेश-भैरव ! पश्य मां करुणाविष्ट, शरणागत-वत्सल !

श्रीभैरव धनाध्यक्ष, शरणं त्वां भजाम्यहम् । प्रसीद सकलान् कामान्, प्रयच्छ मम सर्वदा ।।


।। फल-श्रुति ।।

श्रीमहा-भैरवस्येदं, स्तोत्र सूक्तं सु-दुर्लभम् । मन्त्रात्मकं महा-पुण्यं, सर्वैश्वर्य-प्रदायकम् ।।

यः पठेन्नित्यमेकाग्रं, पातकैः स विमुच्यते । लभते चामला-लक्ष्मीमष्टैश्वर्यमवाप्नुयात् ।।

चिन्तामणिमवाप्नोति, धेनुं कल्पतरुं ध्रुवम् । स्वर्ण-राशिमवाप्नोति, सिद्धिमेव स मानवः ।।

संध्याय यः पठेत्स्तोत्र, दशावृत्त्या नरोत्तमैः । स्वप्ने श्रीभैरवस्तस्य, साक्षाद् भूतो जगद्-गुरुः । स्वर्ण-राशि ददात्येव, तत्क्षणान्नास्ति संशयः । सर्वदा यः पठेत् स्तोत्रं, भैरवस्य महात्मनः ।।

लोक-त्रयं वशी कुर्यात्, अचलां श्रियं चाप्नुयात् । न भयं लभते क्वापि, विघ्न-भूतादि-सम्भव ।।

म्रियन्ते शत्रवोऽवश्यम लक्ष्मी-नाशमाप्नुयात् । अक्षयं लभते सौख्यं, सर्वदा मानवोत्तमः ।।

अष्ट-पञ्चाशताणढ्यो, मन्त्र-राजः प्रकीर्तितः । दारिद्र्य-दुःख-शमनं, स्वर्णाकर्षण-कारकः ।।

य येन संजपेत् धीमान्, स्तोत्र वा प्रपठेत् सदा । महा-भैरव-सायुज्यं, स्वान्त-काले भवेद् ध्रुवं ।।


मूल-मन्त्रः

“ॐ ऐं क्लां क्लीं क्लूं ह्रां ह्रीं ह्रूं सः वं आपदुद्धारणाय अजामल-बद्धाय लोकेश्वराय स्वर्णाकर्षण-भैरवाय मम दारिद्र्य-विद्वेषणाय श्रीं महा-भैरवाय नमः ।”
बटुक भैरव स्तोत्र || 


श्री बटुक-भैरव-अष्टोत्तर-शत-नाम-स्तोत्र


(क) ध्यान


वन्दे बालं स्फटिक-सदृशम्, कुन्तलोल्लासि-वक्त्रम्।
दिव्याकल्पैर्नव-मणि-मयैः, किंकिणी-नूपुराढ्यैः।।

दीप्ताकारं विशद-वदनं, सुप्रसन्नं त्रि-नेत्रम्।
हस्ताब्जाभ्यां बटुकमनिशं, शूल-दण्डौ दधानम्।।


(ख) मानस-पूजन

उक्त प्रकार ‘ध्यान’ करने के बाद श्रीबटुक-भैरव का मानसिक पूजन करे-

ॐ लं पृथ्वी-तत्त्वात्मकं गन्धं श्रीमद् आपदुद्धारण-बटुक-भेरव-प्रीतये समर्पयामि नमः।

ॐ हं आकाश-तत्त्वात्मकं पुष्पं श्रीमद् आपदुद्धारण-बटुक-भेरव-प्रीतये समर्पयामि नमः।

ॐ यं वायु-तत्त्वात्मकं धूपं श्रीमद् आपदुद्धारण-बटुक-भेरव-प्रीतये घ्रापयामि नमः।

ॐ रं अग्नि-तत्त्वात्मकं दीपं श्रीमद् आपदुद्धारण-बटुक-भेरव-प्रीतये निवेदयामि नमः।

ॐ सं सर्व-तत्त्वात्मकं ताम्बूलं श्रीमद् आपदुद्धारण-बटुक-भेरव-प्रीतये समर्पयामि नमः।


(ग) मूल-स्तोत्र


ॐ भैरवो भूत-नाथश्च, भूतात्मा भूत-भावनः।

क्षेत्रज्ञः क्षेत्र-पालश्च, क्षेत्रदः क्षत्रियो विराट्।।१


श्मशान-वासी मांसाशी, खर्पराशी स्मरान्त-कृत्।

रक्तपः पानपः सिद्धः, सिद्धिदः सिद्धि-सेवितः।।२


कंकालः कालः-शमनः, कला-काष्ठा-तनुः कविः।

त्रि-नेत्रो बहु-नेत्रश्च, तथा पिंगल-लोचनः।।३


शूल-पाणिः खड्ग-पाणिः, कंकाली धूम्र-लोचनः।

अभीरुर्भैरवी-नाथो, भूतपो योगिनी-पतिः।।४


धनदोऽधन-हारी च, धन-वान् प्रतिभागवान्।

नागहारो नागकेशो, व्योमकेशः कपाल-भृत्।।५


कालः कपालमाली च, कमनीयः कलानिधिः।

त्रि-नेत्रो ज्वलन्नेत्रस्त्रि-शिखी च त्रि-लोक-भृत्।।६


त्रिवृत्त-तनयो डिम्भः शान्तः शान्त-जन-प्रिय।

बटुको बटु-वेषश्च, खट्वांग-वर-धारकः।।७


भूताध्यक्षः पशुपतिर्भिक्षुकः परिचारकः।

धूर्तो दिगम्बरः शौरिर्हरिणः पाण्डु-लोचनः।।८


प्रशान्तः शान्तिदः शुद्धः शंकर-प्रिय-बान्धवः।

अष्ट-मूर्तिर्निधीशश्च, ज्ञान-चक्षुस्तपो-मयः।।९


अष्टाधारः षडाधारः, सर्प-युक्तः शिखी-सखः।

भूधरो भूधराधीशो, भूपतिर्भूधरात्मजः ।।१०


कपाल-धारी मुण्डी च, नाग-यज्ञोपवीत-वान्।

जृम्भणो मोहनः स्तम्भी, मारणः क्षोभणस्तथा ।।११


शुद्द-नीलाञ्जन-प्रख्य-देहः मुण्ड-विभूषणः।

बलि-भुग्बलि-भुङ्-नाथो, बालोबाल-पराक्रम ।।१२


सर्वापत्-तारणो दुर्गो, दुष्ट-भूत-निषेवितः।

कामीकला-निधिःकान्तः, कामिनी-वश-कृद्वशी ।।१३


जगद्-रक्षा-करोऽनन्तो, माया-मन्त्रौषधी-मयः।

सर्व-सिद्धि-प्रदो वैद्यः, प्रभ-विष्णुरितीव हि ।।१४


।।फल-श्रुति।।


अष्टोत्तर-शतं नाम्नां, भैरवस्य महात्मनः।

मया ते कथितं देवि, रहस्य सर्व-कामदम् ।।१५


य इदं पठते स्तोत्रं, नामाष्ट-शतमुत्तमम्।

न तस्य दुरितं किञ्चिन्न च भूत-भयं तथा ।।१६


न शत्रुभ्यो भयं किञ्चित्, प्राप्नुयान्मानवः क्वचिद्।

पातकेभ्यो भयं नैव, पठेत् स्तोत्रमतः सुधीः ।।१७


मारी-भये राज-भये, तथा चौराग्निजे भये।

औत्पातिके भये चैव, तथा दुःस्वप्नजे भये ।।१८


बन्धने च महाघोरे, पठेत् स्तोत्रमनन्य-धीः।

सर्वं प्रशममायाति, भयं भैरव-कीर्तनात्।।१९


।।क्षमा-प्रार्थना।।

आवाहनङ न जानामि, न जानामि विसर्जनम्।

पूजा-कर्म न जानामि, क्षमस्व परमेश्वर।।


मन्त्र-हीनं क्रिया-हीनं, भक्ति-हीनं सुरेश्वर।
मया यत्-पूजितं देव परिपूर्णं तदस्तु मे।।


श्री बटुक-बलि-मन्त्रः


घर के बाहर दरवाजे के बायीं ओर दो लौंग तथा गुड़ की डली रखें । निम्न तीनों में से किसी एक मन्त्र का उच्चारण करें –


१॰ “ॐ ॐ ॐ एह्येहि देवी-पुत्र, श्री मदापद्धुद्धारण-बटुक-भैरव-नाथ, सर्व-विघ्नान् नाशय नाशय, इमं स्तोत्र-पाठ-पूजनं सफलं कुरु कुरु सर्वोपचार-सहितं बलि मिमं गृह्ण गृह्ण स्वाहा, एष बलिर्वं बटुक-भैरवाय नमः।”


२॰ “ॐ ह्रीं वं एह्येहि देवी-पुत्र, श्री मदापद्धुद्धारक-बटुक-भैरव-नाथ कपिल-जटा-भारभासुर ज्वलत्पिंगल-नेत्र सर्व-कार्य-साधक मद्-दत्तमिमं यथोपनीतं बलिं गृह्ण् मम् कर्माणि साधय साधय सर्वमनोरथान् पूरय पूरय सर्वशत्रून् संहारय ते नमः वं ह्रीं ॐ ।।”


३॰ “ॐ बलि-दानेन सन्तुष्टो, बटुकः सर्व-सिद्धिदः। रक्षां करोतु मे नित्यं, भूत-वेताल-सेवितः।।”
काल भैरव अष्टमी व्रत कथा ||


एक बार त्रिदेव, ब्रह्मा विष्णु एवम महेश तीनो में कौन श्रेष्ठ इस बात पर लड़ाई चल रही थी|

इस बात पर बहस बढ़ती ही चली गई, जिसके बाद सभी देवी देवताओं को बुलाकर एक बैठक की गई|

यहाँ सबसे यही पुछा गया कि कौन ज्यादा श्रेष्ठ है|

सभी ने विचार विमर्श कर इस बात का उत्तर खोजा, जिस बात का समर्थन शिव एवं विष्णु ने तो किया लेकिन तब ही ब्रह्मा जी ने भगवान शिव को अपशब्द बोल दिया, जिससे भगवान शिव को बहुत क्रोधित हुए तथा उनके शरीर से छाया के रूप में काल भैरव की उत्पत्ति हुई ।


मार्गशीर्ष माह की अष्टमी तिथि को ही काल भैरव की उत्पत्ति हुई थी।


क्रोध से उत्पन्न काल भैरव जी ने अपने नाखून से ब्रह्मा जी का सिर काट दिया। इसके बाद ब्रह्म हत्या के पाप से मुक्ति पाने के लिए काल भैरव तीनों लोकों में घूमें परन्तु कही भी उन्हें शांति नहीं मिली, अंत में घूमते हुए वह काशी पहुंचे जहां उन्हें शांति प्राप्त हुई।


वहां एक भविष्यवाणी हुई जिसमें भैरव बाबा को काशी का कोतवाल बनाया गया तथा वहां रहकर लोगों को उनके पापों से मुक्ति दिलाने के लिए वहां बसने को कहा गया ! व् शिवपुराण के अनुसार मार्गशीर्ष मास के कृष्णपक्ष की अष्टमी को दोपहर में भगवान शंकर के अंश से भैरव की उत्पत्ति हुई थी।


इसलिए इस तिथि को काल भैरवाष्टमी या भैरवाष्टमी के नाम से जाना जाता है। पुराणों के अनुसार अंधकासुर दैत्य अपनी सीमाएं पार कर रहा था।

यहां तक कि एक बार घमंड में चूर होकर वह भगवान शिव के ऊपर हमला करने का दुस्साहस कर बैठा। तब उसके संहार के लिए लिए शिव के खून से भैरव की उत्पत्ति हुई ।
काल भैरव अष्टक ||



देवराजसेव्यमानपावनांघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम्।

नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥1॥


भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम्।

कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥2॥


शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम्।

भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥3॥


भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम्।

विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥4॥


धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम्।

स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥5॥


रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरंजनम्।

मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥6॥


अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसंततिं दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम्।

अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥7॥


भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम्।

नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥8॥
श्री काल भैरव के 108 नाम


1. ॐ ह्रीं भैरवाय नम:
2. ॐ ह्रीं भूतनाथाय नम:
3. ॐ ह्रीं भूतात्मने नम:
4. ॐ ह्रीं भू-भावनाय नम:
5. ॐ ह्रीं क्षेत्रज्ञाय नम:
6. ॐ ह्रीं क्षेत्रपालाय नम:
7. ॐ ह्रीं क्षेत्रदाय नम:
8. ॐ ह्रीं क्षत्रियाय नम:
9. ॐ ह्रीं विराजे नम:
10. ॐ ह्रीं श्मशानवासिने नम:
11. ॐ ह्रीं मांसाशिने नम:
12. ॐ ह्रीं खर्पराशिने नम:
13. ॐ ह्रीं स्मारान्तकृते नम:
14. ॐ ह्रीं रक्तपाय नम:
15. ॐ ह्रीं पानपाय नम:
16. ॐ ह्रीं सिद्धाय नम:
17. ॐ ह्रीं सिद्धिदाय नम:
18. ॐ ह्रीं सिद्धिसेविताय नम:
19. ॐ ह्रीं कंकालाय नम:
20. ॐ ह्रीं कालशमनाय नम:
21. ॐ ह्रीं कला-काष्ठा-तनवे नम:
22. ॐ ह्रीं कवये नम:
23. ॐ ह्रीं त्रिनेत्राय नम:
24. ॐ ह्रीं बहुनेत्राय नम:
25. ॐ ह्रीं पिंगललोचनाय नम:
26. ॐ ह्रीं शूलपाणाये नम:
27. ॐ ह्रीं खड्गपाणाये नम:
28. ॐ ह्रीं धूम्रलोचनाय नम:
29. ॐ ह्रीं अभीरवे नम:
30. ॐ ह्रीं भैरवीनाथाय नम:
31. ॐ ह्रीं भूतपाय नम:
32. ॐ ह्रीं योगिनीपतये नम:
33. ॐ ह्रीं धनदाय नम:
34. ॐ ह्रीं अधनहारिणे नम:
35. ॐ ह्रीं धनवते नम:
36. ॐ ह्रीं प्रतिभागवते नम:
37. ॐ ह्रीं नागहाराय नम:
38. ॐ ह्रीं नागकेशाय नम:
39. ॐ ह्रीं व्योमकेशाय नम:
40. ॐ ह्रीं कपालभृते नम:
41. ॐ ह्रीं कालाय नम:
42. ॐ ह्रीं कपालमालिने नम:
43. ॐ ह्रीं कमनीयाय नम:
44. ॐ ह्रीं कलानिधये नम:
45. ॐ ह्रीं त्रिलोचननाय नम:
46. ॐ ह्रीं ज्वलन्नेत्राय नम:
47. ॐ ह्रीं त्रिशिखिने नम:
48. ॐ ह्रीं त्रिलोकभृते नम:
49. ॐ ह्रीं त्रिवृत्त-तनयाय नम:
50. ॐ ह्रीं डिम्भाय नम:
51. ॐ ह्रीं शांताय नम:
52. ॐ ह्रीं शांत-जन-प्रियाय नम:
53. ॐ ह्रीं बटुकाय नम:
54. ॐ ह्रीं बटुवेषाय नम:
55. ॐ ह्रीं खट्वांग-वर-धारकाय नम:
56. ॐ ह्रीं भूताध्यक्ष नम:
57. ॐ ह्रीं पशुपतये नम:
58. ॐ ह्रीं भिक्षुकाय नम:
59. ॐ ह्रीं परिचारकाय नम:
60. ॐ ह्रीं धूर्ताय नम:
61. ॐ ह्रीं दिगंबराय नम:
62. ॐ ह्रीं शौरये नम:
63. ॐ ह्रीं हरिणाय नम:
64. ॐ ह्रीं पाण्डुलोचनाय नम:
65. ॐ ह्रीं प्रशांताय नम:
66. ॐ ह्रीं शां‍तिदाय नम:
67. ॐ ह्रीं शुद्धाय नम:
68. ॐ ह्रीं शंकरप्रिय बांधवाय नम:
69. ॐ ह्रीं अष्टमूर्तये नम:
70. ॐ ह्रीं निधिशाय नम:
71. ॐ ह्रीं ज्ञानचक्षुषे नम:
72. ॐ ह्रीं तपोमयाय नम:
73. ॐ ह्रीं अष्टाधाराय नम:
74. ॐ ह्रीं षडाधाराय नम:
75. ॐ ह्रीं सर्पयुक्ताय नम:
76. ॐ ह्रीं शिखिसखाय नम:
77. ॐ ह्रीं भूधराय नम:
78. ॐ ह्रीं भूधराधीशाय नम:
79. ॐ ह्रीं भूपतये नम:
80. ॐ ह्रीं भूधरात्मजाय नम:
81. ॐ ह्रीं कपालधारिणे नम:
82. ॐ ह्रीं मुण्डिने नम:
83. ॐ ह्रीं नाग-यज्ञोपवीत-वते नम:
84. ॐ ह्रीं जृम्भणाय नम:
85. ॐ ह्रीं मोहनाय नम:
86. ॐ ह्रीं स्तम्भिने नम:
87. ॐ ह्रीं मारणाय नम:
88. ॐ ह्रीं क्षोभणाय नम:
89. ॐ ह्रीं शुद्ध-नीलांजन-प्रख्य-देहाय नम:
90. ॐ ह्रीं मुंडविभूषणाय नम:
91. ॐ ह्रीं बलिभुजे नम:
92. ॐ ह्रीं बलिभुंगनाथाय नम:
93. ॐ ह्रीं बालाय नम:
94. ॐ ह्रीं बालपराक्रमाय नम:
95. ॐ ह्रीं सर्वापत्-तारणाय नम:
96. ॐ ह्रीं दुर्गाय नम:
97. ॐ ह्रीं दुष्ट-भूत-निषेविताय नम:
98. ॐ ह्रीं कामिने नम:
99. ॐ ह्रीं कला-निधये नम:
100. ॐ ह्रीं कांताय नम:
101. ॐ ह्रीं कामिनी-वश-कृद्-वशिने नम:
102. ॐ ह्रीं जगद्-रक्षा-कराय नम:
103. ॐ ह्रीं अनंताय नम:
104. ॐ ह्रीं माया-मन्त्रौषधी-मयाय नम:
105. ॐ ह्रीं सर्वसिद्धि प्रदाय नम:
106. ॐ ह्रीं वैद्याय नम:
107. ॐ ह्रीं प्रभविष्णवे नम:
108. ॐ ह्रीं विष्णवे नम :
।। अथ भैरव तांण्डव स्तोत्र ।।


ॐ चण्डं प्रतिचण्डं करधृतदण्डं कृतरिपुखण्डं सौख्यकरम् ।

लोकं सुखयन्तं विलसितवन्तं प्रकटितदन्तं नृत्यकरम् ।।


डमरुध्वनिशंखं तरलवतंसं मधुरहसन्तं लोकभरम् ।

भज भज भूतेशं प्रकटमहेशं भैरववेषं कष्टहरम् ।।


चर्चित सिन्दूरं रणभूविदूरं दुष्टविदूरं श्रीनिकरम् ।

किँकिणिगणरावं त्रिभुवनपावं खर्प्परसावं पुण्यभरम् ।।


करुणामयवेशं सकलसुरेशं मुक्तशुकेशं पापहरम् ।

भज भज भूतेशं प्रकट महेशं श्री भैरववेषं कष्टहरम् ।।


कलिमल संहारं मदनविहारं फणिपतिहारं शीध्रकरम् ।

कलुषंशमयन्तं परिभृतसन्तं मत्तदृगृन्तं शुद्धतरम् ।।


गतिनिन्दितहेशं नरतनदेशं स्वच्छकशं सन्मुण्डकरम् ।

भज भज भूतेशं प्रकट महेशं श्रीभैरववेशं कष्टहरम् ।।


कठिन स्तनकुंभं सुकृत सुलभं कालीडिँभं खड्गधरम् ।

वृतभूतपिशाचं स्फुटमृदुवाचं स्निग्धसुकाचं भक्तभरम् ।।


तनुभाजितशेषं विलमसुदेशं कष्टसुरेशं प्रीतिनरम् ।

भज भज भूतेशं प्रकट महेशं श्रीभैरववेशं कष्टहरम् ।।


ललिताननचंद्रं सुमनवितन्द्रं बोधितमन्द्रं श्रेष्ठवरम् ।

सुखिताखिललोकं परिगतशोकं शुद्धविलोकं पुष्टिकरम् ।।


वरदाभयहारं तरलिततारं क्ष्युद्रविदारं तुष्टिकरम् ।

भज भज भूतेशं प्रकट महेशं श्रीभैरववेषं कष्टहरम् ।।


सकलायुधभारं विजनविहारं सुश्रविशारं भृष्टमलम् ।

शरणागतपालं मृगमदभालं संजितकालं स्वेष्टबलम् ।।


पदनूपूरसिंजं त्रिनयनकंजं गुणिजनरंजन कुष्टहरम् ।

भज भज भूतेशं प्रकट महेशं श्री भैरव वेषं कष्टहरम् ।।


मदयिँतुसरावं प्रकटितभावं विश्वसुभावं ज्ञानपदम् ।

रक्तांशुकजोषं परिकृततोषं नाशितदोषं सन्मंतिदमम् ।।


कुटिलभ्रकुटीकं ज्वरधननीकं विसरंधीकं प्रेमभरम् ।

भज भज भूतेशं प्रकट महेशं श्रीभैरववेषं कष्टहरम् ।।


परिर्निजतकामं विलसितवामं योगिजनाभं योगेशम् ।

बहुमधपनाथं गीतसुगाथं कष्टसुनाथं वीरेशम् ।।


कलयं तमशेषं भृतजनदेशं नृत्य सुरेशं वीरेशम् ।

भज भज भूतेशं प्रकट महेशं श्रीभैरववेषं कष्टहरम् ।।
काल भैरव स्तुति || 



यं यं यं यक्षरूपं दशदिशिविदितं भूमिकम्पायमानं
सं सं संहारमूर्तिं शिरमुकुटजटाशेखरं चन्द्रबिम्बम्।।


दं दं दं दीर्घकायं विकृतनखमुखं चोर्ध्वरोमं करालं
पं पं पं पापनाशं प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम् ।। १ ।।


रं रं रं रक्तवर्णं कटिकटिततनुं तीक्ष्णदंष्ट्राकरालं
घं घं घं घोषघोषं घ घ घ घ घटितं घर्घरं घोरनादम्।।


कं कं कं कालपाशं धृकधृकधृकितं ज्वालितं कामदेहं
तं तं तं दिव्यदेहं प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम् ।। २ ।।


लं लं लं लं वदन्तं ल ल ल ल ललितं दीर्घजिह्वाकरालं
धुं धुं धुं धूम्रवर्णं स्फुटविकटमुखं भास्करं भीमरूपम्।।


रुं रुं रुं रुण्डमालं रवितमनियतं ताम्रनेत्रं करालं
नं नं नं नग्नभूषं प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम् ।। ३ ।।


वं वं वं वायुवेगं नतजनसदयं ब्रह्मपारं परं तं
खं खं खं खड्गहस्तं त्रिभुवननिलयं भास्करं भीमरूपम्।।


चं चं चं चं चलित्वा चलचलचलितं चालितं भूमिचक्रं
मं मं मं मायिरूपं प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम् ।। ४ ।।


शं शं शं शङ्खहस्तं शशिकरधवलं मोक्षसंपूर्णतेजं
मं मं मं मं महान्तं कुलमकुलकुलं मन्त्रगुप्तं सुनित्यम्।।


यं यं यं भूतनाथं किलिकिलिकिलितं बालकेलिप्रधानं
अं अं अं अन्तरिक्षं प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम् ।। ५ ।।


खं खं खं खड्गभेदं विषममृतमयं कालकालं करालं
क्षं क्षं क्षं क्षिप्रवेगं दहदहदहनं तप्तसन्दीप्यमानम्।।


हौं हौं हौंकारनादं प्रकटितगहनं गर्जितैर्भूमिकम्पं
बं बं बं बाललीलं प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम् ।। ६ ।।


सं सं सं सिद्धियोगं सकलगुणमखं देवदेवं प्रसन्नं
पं पं पं पद्मनाभं हरिहरमयनं चन्द्रसूर्याग्निनेत्रम्।।


ऐं ऐं ऐश्वर्यनाथं सततभयहरं पूर्वदेवस्वरूपं
रौं रौं रौं रौद्ररूपं प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम् ।। ७ ।।


हं हं हं हंसयानं हपितकलहकं मुक्तयोगाट्टहासं
धं धं धं नेत्ररूपं शिरमुकुटजटाबन्धबन्धाग्रहस्तम्।।


टं टं टं टङ्कारनादं त्रिदशलटलटं कामवर्गापहारं
भृं भृं भृं भूतनाथं प्रणमत सततं भैरवं क्षेत्रपालम् ।। ८ ।।


इत्येवं कामयुक्तं प्रपठति नियतं भैरवस्याष्टकं यो
निर्विघ्नं दुःखनाशं सुरभयहरणं डाकिनीशाकिनीनाम्।।


नश्येद्धिव्याघ्रसर्पौ हुतवहसलिले राज्यशंसस्य शून्यं
सर्वा नश्यन्ति दूरं विपद इति भृशं चिन्तनात्सर्वसिद्धिम् ।। ९ ।।


भैरवस्याष्टकमिदं षण्मासं यः पठेन्नरः।।
स याति परमं स्थानं यत्र देवो महेश्वरः ।। १० ।।

 काल भैरव बीज मंत्र || 

“ॐ ह्रीं बटुकाय आपदुद्धारणाय कुरू कुरू बटुकाय ह्रीं”।


काल भैरव का मूल मंत्र || 

“ॐ ह्रीं बटुकाय आपदुद्धारणाय कुरू कुरू बटुकाय ह्रीं”।


पाप विनोचक काल भैरव मंत्र || 

“ॐ ह्रीं बटुक ! शापम विमोचय विमोचय ह्रीं कलीं” !! 


मंगल दोष दूर करने के लिए भैरवजी का सिद्ध मंत्र || 

“धर्मध्वजं शङ्कररूपमेकं शरण्यमित्थं भुवनेषु सिद्धम् ! द्विजेन्द्र पूज्यं विमलं त्रिनेत्रं श्री भैरवं तं शरणं प्रपद्ये” !!


मनोकामना पूरक काल भैरव मंत्र || 

“ॐ नमो भैरवाय स्वाहा”


भय नाशक काल भैरव मंत्र || 

“ॐ भं भैरवाय आप्द्दुदारानाय भयं हन”


शत्रु नाशक काल भैरव मंत्र || 

“ॐ भं भैरवाय आप्द्दुदारानाय शत्रु नाशं कुरु”


जादू टोना नाशक काल भैरव मंत्र || 

“ॐ भं भैरवाय आप्द्दुदारानाय तंत्र बाधाम नाशय नाशय”


बच्चों की रक्षा का काल भैरव मंत्र || 

“ॐ भं भैरवाय आप्द्दुदारानाय कुमारं रक्ष रक्ष”


प्रतियोगिता इंटरवियु में सफलता का काल भैरव मंत्र || 

“ॐ भं भैरवाय आप्द्दुदारानाय साफल्यं देहि देहि स्वाहा:”


लम्बी आयु का काल भैरव मंत्र || 

“ॐ भं भैरवाय आप्द्दुदारानाय रुरु स्वरूपाय स्वाहा:”


बल प्रदाता काल भैरव मंत्र || 

“ॐ भं भैरवाय आप्द्दुदारानाय शौर्यं प्रयच्छ”


सुरक्षा कवच का काल भैरव मंत्र || 

“ॐ भं भैरवाय आप्द्दुदारानाय बज्र कवचाय हुम”


अन्य भैरव मंत्र || 

“ॐ भयहरणं च भैरव:”

“ॐ हं षं नं गं कं सं खं महाकाल भैरवाय नम:”

“ॐ भ्रां कालभैरवाय फट्‍”

“ऊं भं भैरवाय अनिष्ट निवारणाय स्वाहा”

“ॐ कर कलित कपाल कुण्डली दण्ड पाणी तरुण तिमिर व्याल यज्ञोपवीती कर्त्तु समया सपर्या विघ्न्नविच्छेद हेतवे जयती बटुक नाथ सिद्धि साधकानाम ॐ श्री बम् बटुक भैरवाय नमः”

“ॐ क्रीं क्रीं कालभैरवाय फट”

“ॐ हं षं नं गं कं सं खं महाकाल भैरवाय नम:”

“ॐ काल भैरवाय नमः”

“ॐ श्री भैरवाय नमः”

“ॐ भ्रां कालभैरवाय फट्”